दिनेश दुबे यांचं जाणं धक्कादायक आणि मनाला वेदना देणारं – आ.अतुल बेनके

दिनेश दुबे यांचं जाणं धक्कादायक आणि मनाला वेदना देणारं – आ.अतुल बेनके

जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे यांचे निधन 

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. पुणे याठिकाणी खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. दुबे यांच्या अचानक जाण्याने जुन्नर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुबे यांचे निधन हे आम्हां सर्वांसाठी वेदनादायक आहे धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने दुबे कुटुंबाचे, जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे आणि एकंदरीत समाजकारणाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.  – आमदार अतुल बेनके

जुन्नर चे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे ते विश्वासू सहकारी होते. आमदार अतुल बेनके यांचेही ते जवळचे सहकारी म्हणून कार्यरत होते.

आज सकाळीच अतिशय दुःखद बातमी मनाला चटका लावून गेली. वल्लभशेठ बेनके साहेबांचे सहकारी, जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठय नेते आणि आधारस्तंभ, आमचे सहकारी दिनेशभैय्या दुबे यांचे आज पहाटे कोरोनामुळे पुणे याठिकाणी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.

यादरम्यान जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनीही दुबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
“जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते आणि विद्यमान नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणूनही ते सध्या कार्यरत होते. दुबे यांचे निधन हे आम्हां सर्वांसाठी वेदनादायक आहे धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने दुबे कुटुंबाचे, जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे आणि एकंदरीत समाजकारणाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. मी त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो” अशा शब्दांत आमदार बेनके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat