दादांनी फोन केल्यावर आजचा हत्तीसारखा मुख्यमंत्री लगबगीने हलायला लागतो – प्रवीण गायकवाड

 

तुळापुर |  छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३९व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कायर्क्रमास संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते आमदार अजित पवार,आमदार नितेश राणे, सिने कलाकार संतोष मोघे, राष्ट्रसेवा समूहाचे राहुल पोकळे याप्रमुख पाहुण्यांसह हजारो शिवप्रेमींची उपस्थिती होती. गतवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक कार्यक्रम भिमाकोरेगाव येथील दंगलीमुळे पोलीस प्रशासनाकडून विनंती केल्याने रद्द करण्यास आला होता. ज्यामुळे यंदा शिवप्रेमींची संख्या अधिक दिसून आली.

सदर कार्यक्रमात बोलताना संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी अजित पवारांची स्तुती करताना त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले

” अजित दादांनी फोन केल्यावर आजचा हत्तीसारखा मुख्यमंत्री लगबगीने हलायला लागतो आणि हे खर आहे आम्ही पाहिले आहे.”

अजित पवारांच्या कार्यपध्द्तीचे व त्यांच्या नावाच्या वजनाचे अनेक किस्से गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. भाजपचे एकहाती शासन असताना अजित पवार विरोधी पक्षातील नेते असूनही त्यांच्या शब्दांचे वजन इतके असून स्वतः मुख्यमंत्री लगबगीने हलायला लागतात अशी स्तुती यावेळी गायकवाड यांनी पवार यांची केली. शेकाप च्या नेत्यांनी केलेल्या या टिकेमुळे येत्या काळात राजकीय वातावरण भाजप विरोधी असल्याचे संकेत सर्वच स्तरातून एकंदरीत मिळू लागले आहे.

या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणही पुरस्कारार्थींना करण्यात आले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat