तेलदरा आपतग्रस्त कुटुंबियांची अतुल बेनके यांनी घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपतग्रस्तांना भरीव मदत

सजग वेब टिम, जुन्नर

ओतूर | जुन्नर तालुक्यातील तेलदरा याठिकाणी पावसाने घर कोसळून वैष्णवी भुतांबरे आणि कार्तिक केदार या दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते  अतुल बेनके यांनी काल या दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि मानसिक आधार दिला.

या भेटी दरम्यान बेनके यांनी घटनेची माहिती घेऊन लागलीच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना या संबंधीची माहिती कळवून या दोन्ही आपतग्रस्त कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून ४ लाख रु. मदत खासदार डॉ अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नातून शासकीय मदत मिळवून दिली.

तसेच जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले व पंचायत समिती सदस्य विशाल तांबे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मधून घरकुलही मंजूर करून देण्यात आले आहे. पावसामुळे झालेलं घराचं नुकसान आणि संपूर्ण संसारच वाऱ्यावर आल्याने त्या कुटुंबियांना मदत म्हणून बेनके यांनी तातडीने २१ हजार रु.चा किराणाही भरून दिला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीडिया विभागाकडून देण्यात आली आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat