तब्बल २३ वर्षांनी पुन्हा भरली शाळा, आठवणींना उजाळा

बेल्हे | १९९६-९७ च्या इयत्ता १० च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि गुरुजन व कर्मचारी यांचा “कृतज्ञता सन्मान सोहळा” २मे  २०१९, रविवार रोजी सकाळी ११ वाजता बेल्हे  येथील श्री.बेल्हेश्वर विद्यालय या शाळेत यशस्वी रित्या पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप-प्रज्वलनाने व कर्मवीरांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आलेल्या माजी शिक्षकांनी मार्गदर्शन करताना प्रत्येकाने स्वतःची ताकत ओळखून समाजाची आणि स्वतःची प्रगती केली पाहिजे तसेच सवांदातून सर्व प्रश्न सोडविता येतात त्यामुळे सवांद फार महत्वाचा आहे, तुम्ही स्वतःला असे घडवा कि तुमच्या मुला/मुलींनी तुमच्याकडूनच सर्व चांगले गुण आणि संस्कार घेतले पाहिजे तसेच फक्त पैशाच्या मागे न धावत आत्मिक समाधान सुद्धा फार महत्वाचे असते,त्यामुळे पैसा जरून कमवा परंतु तो किती आणि कसा कमावताय हे महत्वाचे आहे तसेच तो योग्यवेळी आणि योग्यठिकाणी खर्चही करायला पाहिजे.

तसेच काही माजी विद्यार्थीनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणी बोलून दाखवल्या,कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक/शिक्षिका तसेच शिपाईमामा यांचा विद्यार्थ्यांनी शाल,श्रीफळ देऊन कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडला.

कार्यक्रम संपल्यांनंतर सर्व शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आनंद घेत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.मान्यवरांचे स्वागत व सूत्रसंचालन प्रशांत गाडेकर यांनी केले तसेच जे शिक्षक व  वर्गमित्रांना देवाज्ञा झाली त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे आभार गणेश पोखरणा यांनी मानले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन गणेश पोखरणा,कैलास भुजबळ,बाजीराव बांगर,निलेश औटी यांनी केले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat