डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धेत ब्लुमिंगडेल शाळेचे उल्लेखनीय यश.

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल मधील विद्यार्थ्यांनी डॉ. सी.व्ही.रमण बाल वैज्ञानिक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे . या विद्यार्थ्यांची युवा वैज्ञानिक इस्रो च्या शैक्षणिक भेट व  कार्यशाळेसाठी निवड झाली आहे.

आजच्या आधुनिक युगामध्ये ‘स्पर्धात्मक परीक्षा’ हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप महत्त्वाचा विषय मानला जातो. ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल मध्ये किंडर गार्डन पासूनच मुलांना स्पर्धात्मक परीक्षेकरिता विविध विषयांचे ज्ञान देऊन तयार करण्यात येते. येथील इयत्ता ६ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची वैज्ञानिक कार्यशाळा व इस्रो (इंडियन सायन्स रिसर्च ऑर्गनायझेशन) करिता निवड झाली आहे. त्या अंतर्गत ह्या मुलांना सतिष धवण कुंभा स्पेस स्टेशन येथे रॉकेट सायन्स विषयाचे मार्गदर्शन मिळणार आहे.

ब्लूमिंगडेल शाळेमधील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे
१. कु. साहिल संजय डोंगरे (जुन्नर तालुका प्रथम क्रमांक)
२. कु अथर्व अशोक मावळे (जुन्नर तालुका द्वितीय क्रमांक)
३. कु. सुजल धनेश गुंदेचा (जुन्नर तालुका द्वितीय क्रमांक)

मुख्याध्यापिका उषा मुती॔ यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विभागातील शिक्षक कोमल घोगरे, तेजस घाडगे, अक्षय गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रोत्साहित केले. व विद्यार्थ्यांना वाढत्या स्पर्धात्मक परीक्षेचे महत्त्व समजावून सांगितले.

शाळेच्या खजिनदार गौरी अतुल बेनके व ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष तसेच जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना अधिक प्रगतीसाठी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat