झाडे लावा,झाडे जगवा मंत्राचा अवलंब करा

सजग वेब टीम, जुन्नर (सुधाकर सैद)
बेल्हे | झासडे लावा झाडे जगवा हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणून एक तरी झाड लावले पाहीजे असे आवाहन एस.एस.रहांगडाले यांनी बोरी बुद्रुक येथे केले.
आय टी सी मिशन सुनहरा कल,डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नारायणगाव आणि ग्रामपंचायत बोरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक वृक्ष लागवड व तंत्र या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गावच्या सरपंच पुष्पा कोरडे,नारायण कोरडे,तुकाराम कोरडे,नाथा पिराजी पाटील, पांडुरंग जाधव,शिवराम जाधव,बाबाजी डांगर, ग्रामविकास अधिकारी फाकटकर,प्रशांत साळवे आदी मान्यवर शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते रहांगडाले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की
दिवसेंदिवस वृक्ष तोड मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे झाडांचे प्रमाण कमी होत चालले असुन भविष्यात याचा मोठा फटका आपल्याला बसणार आहे,त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहीजे तसेच माणसाने कोणत्या ऋतुत कोणती झाडे लावावीत या संदर्भाची माहिती देण्यात आली. तसेच नदीकाठ व वृक्ष विविधता,रस्ते व कोरड जमीन ,वृक्ष बीजगोळे संकल्पना व संभावना,स्थानिकांचे वृक्ष लागवड व दृष्टीकोन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोरी ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat