जे इतरांना जमलं नाही ते बाबूभाऊंनी करून दाखवलं
भाजी विक्रेत्या महिलांकडून स्वच्छतागृहाच्या कामाबद्दल सरपंचांचे कौतुक
राजेशिवछत्रपती प्रतिष्ठानकडून महिलांना महिला दिनाचे शुभेच्छा कार्ड वाटप.
सजग वेब टिम, नारायणगाव
नारायणगाव | नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत जाहीरनाम्यात दिलेला शब्द आता पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेला महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न अखेर लोकनियुक्त सरपंच योगेश (बाबुभाऊ) पाटे यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मार्गी लावलाय. महिला दिनाचे औचित्य साधून महिला स्वच्छतागृहाच्या कामाचे भुमिपूजन पुर्व वेशच्या मागील बाजूस करण्यात आले. शनिवार बाजारतळ याठिकाणी उभारलेल्या स्वच्छतागृहाच्या नंतर आता या आणखी एका स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन झाल्याने नारायणगाव भाजी बाजार संघटनेच्या महिलांनी सरपंचांचे कौतुक केले आहे. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की “जे इतरांना जमले नाही ते बाबुभाऊंनी करुन दाखवले” असे सांगत महिलांनी सरपंच योगेश पाटे यांचे कौतुक केले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, सदस्य आरिफ आतार, राजेश बाप्ते, सारिका डेरे, रुपाली जाधव, मेहबुब काझी, दिपक वारुळे, निलेश दळवी, मयुर विटे, सचिन जुंदरे, प्रा.अशफाक पटेल, संतोष विटे, यांसह मुक्ताई भाजी बाजार संघटनेच्या महिला, सभासद व ग्रामपंचायतच्या महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातुन भाजी बाजारासह गावातील व्यावसायिक महिलांना महिला दिनाचे शुभेच्छा कार्ड देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
Leave a Reply