जुन्नर शिवसेनेने सभापती पद गमावले, उपसभापती पदावर समाधान
जुन्नर शिवसेनेने सभापती पद गमावले, उपसभापती पदावर समाधान
स्वप्नील ढवळे, (सजग वेब टिम, जुन्नर)
जुन्नर | जुन्नर पंचायत समितीचे सभापती पद राखण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. नवीन सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे यांची निवड करण्यात आली तर शिवसेनेला उपसभापती पदावर समाधान मानावं लागले आहे.
शिवसेनेच्या सात सदस्यांपैकी काही सदस्य हे आशाताई बुचके यांच्या गोटातील असल्याने सभापती पदावरचा दावा यावेळी शिवसेनेला करता आला नाही. तसेच सेनेकडून या सदस्यांची मनधरणी करण्यासाठी विशेष प्रयत्नही केले गेले नाहीत.
याच पार्श्वभूमीवर पक्षाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शी महाविकासआघाडी स्थापन करून राज्यातील पॅटर्न तालुक्यात राबविण्यास सहमती दर्शवली आणि आपल्याच घरच्या गटात उपसभापती घेण्यात यश मिळवले, मांजरवाडी चे रमेश खुडे यांना उपसभापती मिळाले.
शिवसेनेने उपसभापती मिळवून यशस्वी माघार घेतल्याची चर्चा सध्या जुन्नर शिवसेनेत आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांनी या निवडीकडे जास्त रस घेतलेला दिसला नाही दुसरीकडे माऊली खंडागळे हे मात्र तालुका प्रमुखाची भूमिका बजावताना दिसले.
Leave a Reply