जुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
जुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर | कोरोना च्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात काल आणि आज कोरोनाचा धुमाकूळ चालू झाला आहे. काल राजुरी गावातील १ संशयित रुग्ण पुणे याठिकाणी पाठविण्यात आला होता. त्यांनंतर आता डिंगोरे याठिकाणी मुंबईकहून गावी आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या व्यक्तीच्या घरातील १३ जणांना पुणे याठिकाणी कोरोना विषाणूची चाचणी आणि तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे अशी माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी फोनवरून कळवली आहे.
गेल्या दोन दिवसांत तालुक्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. प्रशासनाने कडक भूमिका घेत कुणीही घराबाहेर न पडण्याच्या सूचना सर्व नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
आळेफाटा, आळे, संतवाडी, राजुरी, बेल्हे ते आणे पर्यंत ची गावे बफरझोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर नारायणगाव आणि वारूळवाडी या दोन मोठ्या गावांमध्ये सकाळी ६ ते ८ यावेळेत फक्त दूध संकलनासाठी लोकांना बाहेर पडता येईल अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Leave a Reply