जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड
जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड
– अमोल कोल्हेंचा जुन्नर तालुका प्रचार दौऱ्याला जुन्नरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद
सजग वेब टीम, जुन्नर
नारायणगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी काल आपल्या घरच्या तालुक्यात प्रचार दौरा केला. नारायणगाव येथून ग्रामदैवतांचे दर्शन घेत या दौऱ्याची सुरुवात झाली. हनुमान मंदिर ते बस स्टॅन्ड अशी पदयात्रा काढून लोकांच्या गाठीभेटी घेत या प्रचार दौऱ्याची सुरवात झाली बस स्टॅन्ड वर छोटीशी घेतलेली सभा पै. मंगलदास बांदल यांच्या वक्तृत्वाने गाजली.
नारायणगाव नंतर बोरी, पिंपळवंडी, ओतूर, उंचखडक, डिंगोरे , ओझर असा प्रवास करत या प्रचार यातत्रेचा ओझर याठिकाणी समारोप करण्यार आला. या यात्रे दरम्यान अमोल कोल्हे यांना जनतेचा मिळणारा पाठिंबा अभूतपूर्व असा होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.
तत्पूर्वी बांदल यांनी नारायणगाव, ओतूर याठिकाणी बोलताना विद्यमान खासदार आढळराव यांच्यावर विमानतळ, रेल्वे, बैलगाडा,पुणे नाशिक हायवे, ट्रॅफिक या मुद्द्यांवरून तुफान टिका केली. तसेच शिवसेना अंर्तगत असलेल्या वातावरणाचाही थेट उल्लेख त्यांनी यावेळी केला. शरद पवार साहेब, अजितदादा, सुप्रिया सुळे यांच्यावर टिका करणारे आढळराव पाटील यांना सत्तेचा गर्व झाला आहे. हडपसर , भोसरी, शिरूर, खेड या सर्व विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बांदल यांनी यावेळी बोलून दाखवली. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस हि अतुलदादा बेनके यांच्या नेतृत्वाखाली एकसंधपणे काम करत आहे सर्व कार्यकर्त्यांनी या सर्वांच्या मागे उभे राहावे. तसेच अतुल बेनके यांच्या मध्ये आता वल्लभशेठ बेनके दिसायला लागलेत.
नारायणगाव येथे स्टॅन्ड जवळ झालेल्या सभेत नारायणगाव च्या उद्याच्या शिवजयंती चे आमंत्रण देत गावची शिवजयंती आहे डॉक्टर तुम्हीही उपस्थित राहा डॉ अमोल कोल्हे यांना आमंत्रित केले. त्याचवेळी मागे आपल्या कार्यकर्त्यांसह उभ्या असलेल्या सरपंच बाबूभाऊ पाटे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या क्षणी मात्र संपूर्ण सभेचे वातावरण च बदलून गेले. या सभेनंतर सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांनी डॉ अमोल कोल्हे यांना मारलेली मिठी आणि सरपंचांनी गावच्या उमेदवाराला दिलेल्या शुभेच्छा यामुळे काल नारायणगाव मध्येच राजकीय धुळवडीला सुरुवात झाली.
प्रचार सभांना मिळत असलेल्या उस्फुर्त प्रतिसाद पाहता जुन्नरकर जनता घरच्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे उभी राहील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच बांदल यांच्या वक्तृत्वाने सभांचे वातावरण रंगत असून कार्यकर्तेही उत्साहात प्रचार करत आहेत. भाजप च्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आढळराव यांनी कायम सापत्न वागणूक दिलेली आहे त्यामुळे भाजप च्या आमदारांना कार्यकर्त्यांना दुखवू नका ते आपलेच आहेत तसेच खेडचे आमदार सुरेश गोरे हे अमोल कोल्हे यांच्यामुळेच आमदार झाले त्यामुळे तेही आपल्याच बरोबर आहेत असे भुवया उंचावणारे राजकीय वक्तव्य करत त्यांनी काल च्या सभांमध्ये मोठे खुलासे केले.
ओतूर याठिकाणी झालेल्या सभेत जुन्नरकरांचा स्वभाव हा दिलदार असून मोठ्या मनाची प्रेमळ माणसं याठिकाणी राहतात. पोटतिडकीने सांगतो एकदा फक्त सर्वांनी ठरवा आणि समस्त जुन्नरकरांनी शपथ घेऊन आपल्या लाडक्या उमेदवाराला निवडून आणावे असे आवाहन बांदल यांनी यावेळी केले.
Leave a Reply