जुन्नर तालुक्यात पाण्याची टंचाई भासू देणार नाही – आ. अतुल बेनके
जुन्नर तालुक्यात पाण्याची टंचाई भासू देणार नाही – आ. अतुल बेनके
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर | जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणातून सोडले जाणारे पाणी उद्या दिनांक १३ एप्रिलपासून पूर्णपणे बंद केले जाणार असल्याची माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी माध्यमांशी दिली आहे.
तालुक्यातील धरणांमध्ये जुन्नर तालुक्याला पुरेल ईतका पाणीसाठा शिल्लक असून तालुक्याला पाण्याची कुठलीही टंचाई भासू देणार नाही. मागील ३ वर्षांच्या कालावधीत धरणांतील डेड स्टॉक वापरायची वेळ आली होती. परंतु आता डेडस्टॉकला हातसुद्धा लावू देणार नाही, पाण्याची कुणीही काळजी करु नये असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तसेच आदिवासी भागात उन्हाळ्यात पिण्याचे पाण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्याचे नियोजन झाले असून येत्या काही दिवसांतच पाण्याचे टँकर गावोगावी चालू केले जाणार आहेत असे बेनके यांनी सांगितले आहे.
Leave a Reply