जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ वर ; औरंगपूर येथील एकाचा मृत्यू
जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ वर
; औरंगपूर येथील एकाचा मृत्यू
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर | जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. आज औरंगपूर याठिकाणी मुंबईहून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा पहाटे मृत्यू झाला असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींपैकी ३ जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून एका व्यक्तीला पुणे याठिकाणी पाठविण्यात आले आहे.
आज सकाळी विठ्ठलवाडी (वडज) याठिकाणी राहणाऱ्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. तालुक्यातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या १७ झाली आहेत.
रुग्णसंख्या आणि गावे खालील प्रमाणे
सावरगाव ६, धोलवड ३, मांजरवाडी २, पारुंडे २, आंबेगव्हाण २, धालेवाडी तर्फे मिन्हेर १, औंरगपूर १, विठ्ठलवाडी वडज -१ तर डिंगोरे येथील १ व्यक्ती बरी झाली आहे.
तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून जुन्नरकरांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
या सर्व परिस्थितीत प्रशासनाने तालुका रेडझोन म्हणून जाहीर करून कठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी काही नागरिक करत आहेत.
Leave a Reply