जुन्नर तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ५५०० गरजू कुटुंबांना धान्यवाटप
जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक,माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ५५०० गरजू कुटुंबांना धान्यवाटप
सजग वेब टिम, जुन्नर
कांदळी | जुन्नर तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षक,सर्व माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात गरीब व गरजू कुटुंबांना मदत करण्याच्या दृष्टीने मदत निधी उभा करून सुमारे ५००० कुटुंबांना धान्यवाटप करण्याचा निर्णय घेतला व त्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांनी सहभाग घेतला.
धान्य वाटप करण्याचा शुभारंभ तालुक्याचे आमदार अतुल बेनके व तहसिलदार हनुमंत कोळेकर यांचे शुभहस्ते कांदळी औद्योगिक वसाहत येथे प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आला.या वेळी पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे,औद्योगिक वसाहतीचे संचालक अमित बेनके,गटशिक्षणाधिकारी पी.एस.मेमाणे तसेच प्राथमिक,माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी सर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीने पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे,सर्व माध्यमिक शिक्षकांच्या वतीने मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष तबाजी वागदरे,गटशिक्षणाधिकारी पी.एस.मेमाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी आमदार अतुल बेनके म्हणाले,”संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना जुन्नर तालूक्यातील सर्व शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लॉकडाऊन काळात गरीब व गरजू कुटुंबांना मदत करण्याच्या दृष्टीने मदत निधी उभा करून सुमारे ५००० कुटुंबांना धान्यवाटप करण्याचा निर्णय घेतला व समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.तालुक्यातील प्रत्येक गावात शिक्षकांच्या माध्यमातून या स्तुत्य उपक्रमाद्वारे या धान्याचे किट लवकरच पोहोच होईल.”
आमदार अतुल बेनके यांनीही यात ५०० कुटुंबांना धान्याचे किट देण्याचे जाहीर केल्यामुळे सुमारे ५५०० कुटुंबांपर्यंत हि मदत पोहोचणार असून पुढील अडचणीच्या दिवसात कुटुंबांची मोठी गरज भागणार आहे.व शासनावरील भारही कमी होणार आहे. ज्यांना रेशनकार्ड नाही ,यापूर्वी मदत मिळाली नाही ,अतिशय गरीब व गरजू असणाऱ्या कुटुंबांपर्यंत ही मदत दोन दिवसांपर्यंत शिक्षकांमार्फत पोहोचवली जाईल असे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विकास मटाले,आखिल शिक्षक संघाचे अध्यक्ष विवेक हांडे,शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळू लांघी,राज्य संघाचे पदाधिकारी मंगेश मेहेर,विनायक ढोले,महिला आघाडी प्रमुख सुशिला डुंबरे,कार्याध्यक्ष रियाज मोमीन,सरचिटणीस संतोष पानसरे,नेते सदू मुंढे,कोशाध्यक्ष शरद वारुळे,प्रवक्ते अन्वर सय्यद,दिनेश मेहेर,उपेंद्र डुंबरे,हनुमंत गोपाळे,गणेश ढमाले,अशोक बांगर,बाळासाहेब गिलबिले,विजय लोखंडे,ललित गाढवे,विजय अरगडे ,बाळू कडू,सुभाष मोहरे,संदीप तळपे,तुकाराम हागवणे,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गणपुले ,अशोक काकडे,मारुती ढोबळे,पंकज घोलप,गणेश राउत,संजय खराडे,संतोष ढोबळे,भास्कर पानसरे,संजय बाठे,सुनील वाव्हळ,निलेश काशिद,रवि डुंबरे,रमेश ढोमसे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेचे सभापती वैभव सदाकाळ यांनी केले तर आभार माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप यांनी मानले.
Leave a Reply