जुन्नर तालुक्यातील मांजरवाडीच्या पियुषची नवोदयसाठी निवड

जुन्नर तालुक्यातील मांजरवाडीच्या पियुष ची नवोदय साठी निवड.

(जवाहर नवोदय साठी निवड झालेल्या पियुष मुळे व वर्गशिक्षक संजय रणदिवे यांचा सत्कार करताना ग्रामस्थ)

जुन्नर तालुक्यातील एकमेव विद्यार्थी; संजय रणदिवे सरांचे प्रयत्न कौतुकास्पद : मेमाणे

सजग वेब टिम, जुन्नर 

जुन्नर | जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या वतीने पाचवीच्या वर्गासाठी घेण्यात आलेल्या नवोदय निवड प्रवेश परीक्षेत जुन्नर तालुक्यातील एकमेव मांजरवाडी शाळेचा पियुष अविनाश मुळे याची निवड झाल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे यांनी दिली.
गतवर्षी जुन्नर तालुक्यात शिष्यवृत्ती ,नवोदय परीक्षांसाठी शिक्षकांच्या वतीने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले जात होते.मांजरवाडी शाळेतील अष्टपैलू शिक्षक संजय रणदिवे यांनी वर्षभर अधिकचा वेळ देऊन,विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केल्याने आज तालुक्यात एकमेव त्यांच्या वर्गातील विदयार्थ्यांची निवड झाल्याने त्या शिक्षकांच्या कामाचे कौतुक करणे गरजेचे आहे.

“मांजरवाडी शाळा व तेथील शिक्षक हे उपक्रमशील असल्याने नवोदय सारख्या परीक्षेत शाळेने तालुक्याचा बहुमान वाढवला आहे.शिष्यवृत्ती मध्ये देखील मुले येतील. अष्टपैलू शिक्षकाचा विद्यार्थी देखील तसाच घडतो हे उदाहरण आहे.म्हणून ग्रामस्थांनी शिक्षकांना प्रेरणा द्या गुणवत्ता नक्कीच मिळते.”

पी.एस.मेमाणे, (गटशिक्षण अधिकारी,जुन्नर)

नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल पियुष व त्याचे वर्गशिक्षक संजय रणदिवे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे,माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे,पंचायत समिती उपसभापती रमेश खुडे,सरपंच सूर्यकांत थोरात,व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय खंडागळे,उपाध्यक्ष सुषमा मुळे, माजी सरपंच संतोष मोरे, मुख्याध्यापक यशवंत गवारी,जयसिंग थोरात,वाकोबा गायकवाड, सयाजीराव चिखले, संतोष मुळे,अविनाश मुळे,सीमा मुळे व सर्व शिक्षक उपस्थित होते.
तालुक्यातील एकमेव विद्यार्थी निवड झाली असल्याने गुणवत्तेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांसमवेत त्याच्या घरी जाऊन सत्कार करणारे पहिले गटशिक्षण अधिकारी असल्याने मेमाणे साहेबांचे मांजरवाडीत सर्वत्र कौतुक आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat