जुन्नर तालुक्यातील पहिल्या शिवभोजन केंद्राचे तहसिलदारांच्या हस्ते उदघाटन
जुन्नर तालुक्यातील पहिल्या शिवभोजन केंद्राचे राजुरी येथे तहसिलदारांच्या हस्ते उदघाटन
संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था, राजुरी या संस्थेला मंजुर झालेल्या शिवभोजन केंद्राला सुरुवात
५ रुपयांत मिळणार गोरगरिबांना जेवण
राजुरी | संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था, राजुरी या संस्थेला शिवभोजन केंद्र मंजूर झाले असुन जुन्नर तालुक्यातील पहिल्या शिवभोजन केंद्राचे उदघाटन राजुरी येथे तहसिलदार हनुमंत कोळेकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यामुळे आता परिसरातील गोरगरिब नागरिकांना ५ रुपयांत जेवण मिळणार आहे.
देशासह राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपात्कालीन परिस्थितीमध्ये गोरगरीब व रोजंदारीवर काम करणारे असंघटित कामगार हे मोठ्या प्रमाणात विस्थापित होत आहेत. हे कामगार अन्नापासून वंचित राहू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहेत. सध्याच्या परीस्थितीचा विचार करुन शिवभोजन थाळी १० रुपयांऐवजी ५ रूपयांना देण्यात येत आहे.
या शिवभोजन केंद्रांच्या उद्घाटनप्रसंगी माजी सभापती दिपक आवटे, सरपंच एम.डी. घंगाळे, बाळासाहेब औटी, संकल्प संस्थेचे संस्थापक
गुलाबनबी शेख, माऊली शेळके, जाकीर अल्ली पटेल, मुबारक तांबोळी, संकल्प अन्नपूर्णा समितीचे पदाधिकारी व सदस्य यानिमित्तानं उपस्थित होते.
Leave a Reply