जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके
जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके
सजग टाईम्स न्यूज, बेल्हे
बेल्हे | निसर्ग चक्रीवादळात नुकसान भरपाई न मिळालेल्या या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानभरपाई पासून वंचित राहिलेल्या गुळुंचवाडी शिवारातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर पंचनामे करण्यात येणार आहे. निसर्ग चक्रीवादळात घरे आणि समाज मंदिर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी सजग टाईम्स ला दिली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे २८ कोटी रुपयांची रक्कम महसूल विभागाने नुकतीच वर्ग केली असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली. पूर्व पट्ट्यातील गुळुंचवाडी शिवारातील समाज मंदिरे आणि घरं यांचे निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान झाले होते. या भागाचा दौरा त्यांनी केला. या वेळी अतुल भांबेरे मित्र मंडळ आणि स्वराज सोशल फाउंडेशन यांच्या वतीने या शिवारातील गरीब व गरजू कुटूंबांना दिवाळी फराळ वस्तूंचे वाटप आमदार बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल भांबरे,विजय कुऱ्हाडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यात सिंचन क्षेत्र अर्थात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानभरपाईसाठी सर्वाधिक २१ कोटी ८७ लाख २१ हजार ६४५ रुपये त्या खालोखाल घरांच्या नुकसानी साठी चार कोटी २२ लाख ७० हजार रुपये इतर नुकसानीसाठी दोन कोटी १९ लाख २० हजार रुपये असे एकूण २८ कोटी रुपयांची मदत निधी महसूल विभागाकडे जमा झाला होता. ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
Leave a Reply