जुन्नरचे आमदार अतुल बेनके ७ दिवसांसाठी गृह विलगीकरणात
जुन्नरचे आमदार अतुल बेनके ७ दिवसांसाठी गृह विलगीकरणात
सजग वेब टीम, जुन्नर
नारायणगाव | गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही कोरोनाबाधित होताना दिसत आहेत. यात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भोसरी चे आमदार महेश लांडगे, हडपसर चे माजी आमदार योगेश टिळेकर, दौंड चे आमदार राहुल कुल आदी लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातच आता जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनाही त्रास जाणवू लागल्याने व कोरोनासदृश लक्षणे दिसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.
सुदैवाने हि टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ११ जुलै ला पुन्हा टेस्ट करण्यात येईल परंतु खबरदारी म्हणून डॉक्टरांनी बेनके यांना ७ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले आहे. अशी माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी खालील संदेश जुन्नरकरांना दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करताना प्रशासनाशी समन्वय साधताना, नागरिकांच्या समस्यांचे निवारण करताना अनेकांशी माझा संपर्क येत आहे.
योग्य ती काळजी घेत असलो तरीही कामानिमित्त फिरताना कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क आल्याने आणि काही प्रमाणात लक्षणे आढळून आल्याने सोमवार दि.०६ जुलै रोजी मी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट करण्यात आली व सुदैवाने ती निगेटिव्ह आली आहे. तसेच दि.११ जुलै रोजी दुसरी टेस्ट करण्यात येणार आहे. परंतु खबरदारी म्हणून डॉक्टरांनी मला ७ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले आहे
माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या सर्व परिस्थितीत विलगीकरण काळात मी कुणालाही भेटू शकणार नाही. विलगीकरणात असलो तरीही तालुक्यातील बाकीची कामे सुरू राहणार आहेत कुठलेही काम थांबणार नाही याची मी काळजी घेत आहे. तालुक्यातील सर्व घडामोडींवर माझे बारीक लक्ष आहे. प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून आहे.
आपल्या सेवेसाठी, काही काम असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
पुष्कर ब्रह्मे – ९८६०१७६६४४
प्रसाद पानसरे – ९७६७१४१४१४ / ७७९८३७४६३५
आपण सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा, अनावश्यक बाहेर फिरू नका, स्वच्छता पाळा आणि कुटुंबियांची काळजी घ्या हि नम्र विनंती.
आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत लवकरच मी आपल्या सेवेत पुन्हा दाखल होईल… धन्यवाद!
Leave a Reply