जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी
जुन्नर तालुका शिवसेनेत खळबळ
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर | पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या शिवसेनेचे आक्रमक नेतृत्व आशाताई बुचके यांची पक्षाने हकालपट्टी केल्याचे वृत्त आज सामना दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताने जुन्नर तालुका शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांच्या वर हि कारवाई केली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून या संबंधित एक पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हि कारवाई उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने झाली आहे असे जरी वृत्तात म्हंटले असले तरी या कारवाई मागे असणाऱ्या बुचके यांच्या विरोधी गटाच्या पारड्यात पक्षाने वजन टाकले आहे असे स्पष्टपणे दिसत आहे.
या कारवाई नंतर बुचके यांचा गट काय भूमिका घेतो हे महत्वाचे ठरेल. जुन्नर शिवसेनेत सोनवणे गट आणि बुचके गट असा अंतर्गत संघर्ष होता परंतु या कारवाईने पक्षाने सोनवणे यांना विधानसभेसाठी रस्ता मोकळा करून दिला आहे असंच म्हणावं लागेल.
Leave a Reply