छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक – प्रा. नितीन बानुगडे
छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक – प्रा. नितीन बानुगडे
शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी शिवरायांचा पराक्रमांचा उलगडला इतिहास
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव दि.१३ | छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक होते असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितिन बानुगडे यांनी केले. नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात प्राध्यापक नितिन बानुगडे यांनी आपल्या शिव विचारांमधून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमांचा उलगडा केला. गेली सतत तेरा वर्ष प्राध्यापक बानुगडे हे नारायणगाव येथे शिवव्याख्यान करीत आहेत.
यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .
यामध्ये पत्रकारिता पुरस्कार प्रा.अशफाक पटेल, कृषी उद्योजक सुरज औटी, डॉ. अनुष्का शिंदे, वन कर्मचारी धोंडू कोकणे, वन मित्र जालिंदर कोरडे , कृषी मित्र सुजित पाटे, मंगेश भास्कर, कबड्डीपटू मनोज बोंद्रे, सरपंच ज्योती वामन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास राजे थोरात, व सूर्या अकॅडमी यांना सन्मानित करण्यात आले.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश उर्फ बाबू पाटे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष शंकर शेठ पिंगळे व संचालक मंडळ, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, संतोष नाना खैरे, उद्योजक संजय वारुळे, सुजित खैरे शरद चौधरी, अर्चना माळवदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर औटी, मेहबूब काझी, आशिष माळवदकर यांनी केले. तर आभार अजित वाजगे यांनी मानले.
Leave a Reply