चिंचोलीच्या काशिद परिवाराने आशा सेविकांना दिले मोफत आरोग्य रक्षक कीट

चिंचोलीच्या काशिद परिवाराने आशा सेविकांना दिले मोफत आरोग्य रक्षक कीट

सजग वेब टिम, जुन्नर

येणेरे | कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने शहारा पाठोपाठ ग्रामीण भागात ही पाय पसरू लागला आहे. आरोग्य क्षेत्रात डॉक्टर , नर्स , आया यांच्या बरोबर ग्रामीण भागात “आशा सेविका ” देखील काम करीत आहे .घरोघरी जाऊन लोकांचा सर्व्हे करताना त्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया मध्ये नोकरी करणारे चिंचोलीचे संतोष शांताराम काशिद यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र , येणेरे तील आशा सेविकांना “आरोग्य रक्षक कीट ” मोफत वाटप केले आहे.

या आरोग्य कीट मध्ये रक्तदाब तपासणी यंत्र , मधुमेय तपासणी यंत्र , तापमापक यंत्र , मास्क व सॅनिटायझर चा समावेश आहे .या आशा सेविका ग्रामीण भागात अत्यंत अल्प मानधनावर काम करीत आहे .

याच वेळी डीसेन्ट फाउंडेशन च्या माध्यमातून धालेवाडी चे सागर विधाटे यांनी देखील गोळेगाव व धालेवाडी मधील आशा सेविकांना आरोग्य रक्षक कीट उपलब्ध करून दिले.

या प्रसंगी पंचायत समिती, जुन्नर चे आरोग्य अधिकारी डॉ.अजय गोडे , येणेरे केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमलता शेखरे, डीसेन्ट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई , श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर , पारुंडे चे माजी मुख्याध्यापक एफ.बी.आतार , सामाजिक कार्यकर्ते संदिप पानसरे, गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे वारकरी संस्थेचे व्यवस्थापक शंकर पवार, नर्सेस, आशा सेविका उपस्थित होते .

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat