चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे
चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे
सजग वेब टिम, महाराष्ट्र
नवी दिल्ली | चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा. अमोल कोल्हे यांनी आज
लोकसभेत शून्यप्रहराच्या कामकाजात सहभाग घेताना केली. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी चाकण या मध्यवर्ती ठिकाणी विमानतळ निर्मिती व्हावी अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात आज तीन मोठ्या एमआयडीसी असून येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय, छोटया मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत, सोबतच या भागातील प्रगतशील शेतकरी यांच्या कष्टामुळे मोठया प्रमाणावर जागतिक दर्जाचे शेतमालाचे उत्पन्न घेतले जाते आणि ते जगाच्या बाजारपेठेत पाठवले जाते.
तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघात आळंदी , भीमाशंकर भक्तिपीठे आहेत, ऐतिहासिक वारसास्थळे किल्ले शिवनेरी, वढू तुळापूर, अष्टविनायकांपैकी ४ भक्तीपीठे मतदारसंघात येतात .
खेड तालुक्यातील चाकण या ठिकाणी कृषीनिर्यात,औद्योगिक देवाण-घेवाण,करणाऱ्या विमानतळाची निर्मिती केल्यास या भागातील पर्यटन, औद्योगिक क्षेत्र व कृषीमाल निर्यात करण्यासाठी निश्चितच फायदा होईल यासाठी आज चाकण विमानतळ निर्मिती करण्याची मागणी केली खा. कोल्हे यांनी केली आहे.
Leave a Reply