चांगल्या कार्यासाठी मनातील सूर्य सतत तळपत ठेवा – अश्विनी महांगडे
चांगल्या कार्यासाठी मनातील सूर्य सतत तळपत ठेवा – अश्विनी महांगडे
ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर माता पालक संघ, समविचारी प्रतिष्ठान आणि पोलीस स्टेशन नारायणगाव यांच्यावतीने दत्तक शाळा योजना कार्यक्रम संपन्न
नारायणगाव | समाजामध्ये चांगले कार्य करण्यासाठी आपल्या मनातील सूर्य सतत तळपत ठेवा. मुलींनी निर्भयपणे समाजापुढे राहा, समाजातील चांगल्या व्यक्ती,संस्था,पोलीस यंत्रणा आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव महिलांच्या पाठीशी उभ्या आहेत. पोलीस बांधवांचा सन्मान करा, असे मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी व्यक्त केले.
ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर माता पालक संघ, समविचारी प्रतिष्ठान आणि पोलीस स्टेशन नारायणगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या माता-पालक, विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या मेळाव्यामध्ये अश्विनी महांगडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, अभिजित पवार,मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, प्राचार्य श्रीकांत शेवाळे समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वारुळे, राजेश रत्नपारखी, गणेश देशमुख,प्रदिप कांबळे, पालक संघाच्या उपाध्यक्षा यमुनाताई घुले, उपाध्यक्ष मनोहर वायकर, उपमुख्याध्यापक रमेश घोलप, पर्यवेक्षक दत्तात्रय कांबळे, अनुराधा पुरानिक, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस स्टेशन नारायणगाव यांनी विद्यार्थी सुरक्षितेसाठी सुरू केलेली शाळा दत्तक योजना हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे मनोगत अश्विनी महांगडे यांनी व्यक्त केले.
पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध शाळा व महाविद्यालयासाठी या उपक्रमांतर्गत स्वतंत्र पोलिस कर्मचारी नियुक्त केला असून विद्यार्थी सुरक्षितेसाठी सर्व काळजी घेतली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
मिना नदी स्वच्छता अभियानांतर्गत जन प्रबोधनासाठी विद्यामंदिरातील शिक्षक काशिनाथ आल्हाट,सुभाष दुबळे, आशा भालेराव, अनुपमा पाटे यांनी विद्यार्थ्यांचे कलापथक तयार केले असून त्याद्वारे जणतेचे प्रबोधन केले जाईल अशी माहिती मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी सांगितले.
यावेळी पोलीस स्टेशन नारायणगाव यांचे शाळा दत्तक योजनेचे व विद्यामंदिराच्या कलापथकाचे उदघाटन अश्विनी महांगडे यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी व सूत्रसंचालन अनुपमा पाटे यांनी केले. आभार मेहबूब काझी यांनी मानले.
Leave a Reply