गोपीचंद पडळकर यांच्याविरूद्ध जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
गोपीचंद पडळकर यांच्याविरूद्ध जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
नारायणगाव पोलिस स्टेशन व जुन्नर तालुक्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये कारवाई करण्याची मागणी
जुन्नर | देशाचे माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण शरद पवार कोरोनाच्या संकटकाळात व चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्रातील जनतेला आधार देत असताना भाजप चे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबद्दल खालच्या शब्दांत वक्तव्य केले आहे.
कोविड १९ च्या संकटकाळात कोरोनाविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होत असताना गोपीचंद पडळकर यांनी पवारांविषयी जे वक्तव्य केले आहे त्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केली आहे व तालुक्यातील प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.
Leave a Reply