खेड घाटातील बाह्यवळणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करा : खा. डॉ अमोल कोल्हे.
प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली घाटाची पाहणी
सजग वेब टिम, राजगुरूनगर
राजगुरूनगर | शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे -नाशिक महामार्गावरील खेड घाटाचे अपूर्ण काम, ट्रॅफिक समस्या या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत घाटाची पाहणी केली व त्यासंबंधीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे-नाशिक महामार्गावर ट्राफिकची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही लवकरात लवकर हि समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचं डॉ अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज डॉ. कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या
यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या या आधीच्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अधिकारी वर्गास सोबत घेऊन जमीन अधिग्रहित केली, तसेच स्वार्थासाठी व स्वतःची जमीन वाचवण्यासाठी हा शेतकऱ्यांच्या जमिनी घालवल्या असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
याप्रसंगी खेड तालुक्याचे मा. आ. दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे संचालक धैर्यशील पानसरे, तुकाईवाडीचे सरपंच महेंद्र ठिगळे, प्रवीण कोरडे, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply