खून करून फरार झालेला आरोपी २४ तासाच्या आतमध्ये ताब्यात
खून करून फरार झालेला आरोपी २४ तासाच्या आतमध्ये ताब्यात.
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व नारायणगाव पोलिस स्टेशन यांची संयुक्त कारवाई.
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर|पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह नारायणगाव परिसरात गस्त करीत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक राजू पवार यांना गोपनीय बातमी मिळाली की दि ०९/०६/२०२० रोजी आपल्या चुलत भावाचा खून करून फरारी झालेला आरोपी अमोल बाळकृष्ण भुजबळ वय वर्ष २६ राहणार आनंदवाडी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा दुचाकीवरून खेड वरून मंचर च्या दिशेने येत आहे बातमी मिळाल्यानंतर नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांचा स्टाफ मदतीला घेऊन सदर आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले व पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई संदीप पाटील पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, विवेक पाटील अपर पोलीस अधीक्षक पुणे, दीपाली खन्ना उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर उपविभाग. पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील नारायणगाव पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू पवार, किरण कुसाळकर नारायणगाव पोस्टेचे भीमा लोंढे व शैलेश वाघमारे या पथकाने केली.
Leave a Reply