खा. आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आयोजित शिबीराला उदंड प्रतिसाद

सजग वेब टीम (संतोष पाचपुते, आंबेगाव)

पारगाव | शिरूर लोकसभा मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार मा.शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्र सरकारच्या स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालयांतर्गत, शिरूर लोकसभा मतदार संघातील नागरिकांसाठी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचा उदघाटन समारंभ शनिवार दिनांक ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता खासदार मा.शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचर, तालुका-आंबेगाव, जिल्हा-पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.
—————————————————————

आरोग्या बाबत नागरिकांची जनजागृती होणे गरजेचे असून केंद्र सरकारच्या मार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व आरोग्य विषयक विमा योजनांचा ग्रामीण भागातील नागरिकांनी नक्कीच फायदा घ्यावा असे अवाहन शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचर येथील सर्वरोग निदान व उपचार शिबीराच्या उदघाटन प्रसंगी केले.

यावेळी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.मा.नितीन बिलोलीकर, पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मा.दिलीप माने, शिवसेनेच्या पुणे जिल्हा परिषद गटनेत्या मा.सौ.आशाताई बुचके, मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ.मा.सिमा देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष मा.अरुणभाऊ गिरे, खेड तालुका पंचायत समितीचे मा.उपसभापती मा.राजुशेठ जवळेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.रविंद्रजी करंजखेले, शिवसेना तालुकाप्रमुख मा.सुनिलभाऊ बाणखेले, युवासेना राज्य विस्तारक मा.सचिन बांगर, जिल्हा परिषद सदस्य मा.देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्या मा.सौ.शितलताई तोडकर, मंचर गावचे सरपंच मा. दत्ताभाऊ गांजाळे, शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष उपजिल्हाप्रमुख मा.शिवाजीराव राजगुरू, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.संतोष नाना खैरे, शिवउद्योग व सहकार सेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख मा.सागर काजळे, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी मा.कल्पेश आप्पा बाणखेले, युवासेना तालुका युवा अधिकारी मा.प्रविण थोरात पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख मा.संतोष डोके, मा.अशोक थोरात, शिवसेना मंचर शहरप्रमुख मा.संदीप जुन्नरे, युवानेते मा.अमोल दाभाडे, मंचरचे उपसरपंच मा.धनेश बाणखेले, जेष्ठ नेते मा.रंगनाथ थोरात, मंचर ग्रामपंचायत सदस्य मा.अरुण नाना बाणखेले यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य विभागातील अधिकारी, नागरिक व रुग्ण उपस्थित होते.

शिबिराच्या पहिल्या दिवशी दोन हजार पेक्षा अधिक नागरिक व रुग्णांनी ह्या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत ह्या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबीर दिनांक १० फेब्रुवारी २०१९, सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत सुरू राहणार असून ह्या जास्तीत जास्त गरजू व्यक्तींनी या शिबिरात सहभागी होऊन आरोग्य योजनांचा मोफत लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat