खा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव ग्रामीण रुग्णालयास मल्टीपर्पज पॅरामिटर टेस्टिंग मशीन भेट
खा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव ग्रामीण रुग्णालयास मल्टीपर्पज पॅरामिटर टेस्टिंग मशीन भेट
सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव
नारायणगाव | शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व बंधन बॅंक यांच्यावतीने डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटरला हाई फ्लो नझल ऑक्सिजन व मल्टीपर्पज पॅरामिटर टेस्टिंग मशीन ग्रामीण रुग्णालय नारायणगावचे प्रतिनिधी डॉ.योगेश आगम, डॉ. मिलिंद घोरपडे, डाॅ. अभिजीत काळे, जुन्नर तालुका डॉक्टर असोसिएशनचे डॉ.सदानंद राऊत, जगदंब प्रतिष्ठानचे प्रतिनिधी सागर रामसिंग कोल्हे, यांच्यातर्फे आज सुपूर्त करण्यात आले.
सध्या कोविड आजाराने सर्वत्र थैमान घातले असून जुन्नर तालुक्यातील नागरिकांच्या उपचारामध्ये मदत होण्यासाठी हे अत्याधुनिक मशिन अत्यंत महत्त्वपूर्ण असून सदर उपकरणामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणाऱ्या रुग्णांसाठी हे उपकरण जीवनदायी ठरणार असून टेस्टिंग मशिनमध्ये २४ प्रकारच्या चाचण्या मोफत होणार असल्याची माहिती डाॅ.योगेश आगम यांनी दिली.
खा.कोल्हे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपून एक संवेदनशील उपक्रम समाजोपयोगी कार्य करून आपला वाढदिवस साजरा करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे .
सदर कार्यक्रमास आशाताई बुचके, सत्यशिल शेरकर, दिलीप कोल्हे , तहसिलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, बंधन बॅंकेचे मॅनेजर आदित्य मराठे, तुषार डोके, अतुल आहेर, गणेश वाजगे, आशिष हांडे, संतोष केदारी, राहुल गावडे, मुकेश वाजगे, राजु कारभळ, डाॅ.सुदाम पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते
Leave a Reply