क्रीडाक्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी – काकासाहेब पवार
बाबाजी पवळे (सजग वेब टीम)
राजगुरूनगर | आपल्याकडे खेळ म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त मनातला ताणताणाव दूर करण्याचे माध्यम मानले जाते. परंतु आता खेळामध्ये सोनेरी भविष्य निर्माण झाले असून क्रीडाक्षेत्रात करीयरची उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू व वस्ताद काकासाहेब पवार यांनी केले ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील होते. या प्रसंगी संचालक बाळासाहेब सांडभोर, डॉ. रोहिणी राक्षे, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम. जगताप, उपप्राचार्य जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, पहिलवान शिवराज राक्षे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा.तानाजी पिंगळे, प्रा.सारिका गोरे, प्रा.योगेश मोहिते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
काकासाहेब पवार म्हणाले की, खेळात करियर करण्यासाठी खेळाचे आकर्षण असणे गरजेचे आहे. खेळात चांगली कामगिरी करणाऱ्या
खेळाडूंना शासकीय व विविध खाजगी कंपन्यात नोकरीची संधी उपलब्ध आहे. कुस्तीपटू राहुल आवरी याने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यावर महाराष्ट्र सरकारने त्याची पोलीस सेवेत मोठ्या पदावर नियुक्ती केली. आपणही मनातील भीती दूर करून प्रचंड मेहनत घेऊन आपली स्वप्नपूर्ती करावी असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी क्रिकेट या खेळाबरोबर कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन या खेळांनाही विविध लीगमुळे चांगले दिवस आले असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थी हा खेळाडू हवा आणि त्याच्यात खिलाडूवृत्ती हवी. खेळामुळे व्यक्ती अधिक प्रगल्भ होते. त्याचा आत्मविश्वास वाढतो. देशासाठी खेळण्याचा आनंद आणि अभिमानामुळे मिळणाऱ्या समाधानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही असे सांगून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राच्या पर्यायाचा करियर म्हणून विचार करण्याचे आवाहन करून सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
या पारितोषिक वितरण समारंभात आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे झालेल्या अखिल भारतीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ६ वा क्रमांक आलेल्या सारिका खिलारे या विद्यार्थिनीचा सुमारे ५ हजार रुपयाचे नानासाहेब थिगळे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या शिवाय राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्तरावर नेटबॉल, हॅण्डबॉल, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिकस व पावरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगती गोपनारायण, रोहित जाधव, अक्षय घोंगे, राजकुंवर तापकीर, केतन सांडभोर, सुरज घोगरे, अंकिता गायकवाड, ऋतुजा नाणेकर संदीप वाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विशाल बांदल, प्रगती उतर्डे, प्रतीक्षा उतर्डे. एन.सी.सी.मधील प्रवीण बोरकर, चंद्रशेखर रणपिसे, मयूर सावंत, सांस्कृतिक विभागातील प्रगती गोपनारायण, विद्या ठोंबरे, पायल नेटके, हस्ताक्षर स्पर्धेत गणेश कुलकर्णी, मला आवडलेला वक्ता या स्पर्धेतील राहुल सरोदे, तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थी असलेल्या कृतिका गुंजाळ, वैशाली ठोंबरे, वैशाली लांडे, अभिजित बेंडाले, सीमा आरुडे, मयुरी भवारी, तेजल राऊत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बारावीला गणित विषयात १०० गुण मिळविणाऱ्या सिद्धेश रामाने याचाही गौरव करण्यात आला.
साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
या निमित्ताने जीमखाना विभागातील वेटलिफ्टिंग स्टँडचे उदघाटन काकासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस बी पाटील, सूत्रसंचालन प्रा. शाम खेत्रे यांनी, पारितोषिक वाचन प्रा. प्रतिमा लोणारी व प्रा. दिलीप मुळूक यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा. सारिका गोरे यांनी तर आभार उपप्राचार्य जी.जी.गायकवाड यांनी मानले.
Leave a Reply