कार्यालय द्या आणि पाणी घ्या – शरद सोनवणे
आमदार सोनवणे यांनी पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी केले बंद
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर | पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय नारायणगाव येथून अळकुटी ला हलविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्गाने सरकार आणि प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या या निर्णयाचे पडसाद राजकीय पटलावरही पाहायला मिळत आहेत. ९ सप्टेंबर पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल बेनके यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारून आळेफाटा येथे ठिय्या आंदोलन चालू केले. त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस, आज सकाळी आंबेगाव चे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी ही या आंदोलनास भेट दिली आणि आपला पाठिंबा आंदोलनाला दिला. त्यानंतर आता आमदार शरद सोनवणे यांनी ही या निर्णयाला विरोध करत पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याचे पुढे जाणारे पाणी बंद केले.
जोपर्यंत शासन हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत पाणी पुढे जाऊ देणार नाही. तसेच उद्या सकाळी येडगाव आणि माणिकडोह धरणाचेही पुढे जाणारे पाणी बंद करणार असा इशारा आमदार सोनवणे यांनी दिला आहे.
Leave a Reply