उस्मानाबाद चे उपअधीक्षक रवींद्र भारत थोरात यांचे निधन
उस्मानाबाद चे उपअधीक्षक रवींद्र भारत थोरात यांचे निधन
नारायणगावच्या विकासात लाभलेलं अनमोल सहकार्य स्मरणात राहिल – सरपंच योगेश पाटे
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव| उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले उपअधीक्षक रवींद्र भारत थोरात यांचे सोमवारी (ता.१३) रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास सोलापूर येथे निधन झाले.
थोरात हे २०१४ – १६ या कालावधीत नारायणगाव पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणुन कार्यरत असताना नारायणगावकरांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या अचानक जाण्याने नारायणगाव सह जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. यानिमित्तानं नारायणगाव पोलिस स्टेशनच्यावतीने ग्रामस्थ, ग्रामसुरक्षा दल, पत्रकार यांच्यावतीने अर्जुन घोडे पाटील यांच्याकडुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानिमित्तानं लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी आपल्या फेसबुक वर श्रद्धांजली वाहत नारायणगावच्या विकासात लाभलेलं अनमोल सहकार्य तसेच २०१५ साली झालेल्या अन्यायाला थोरात साहेबांनी सत्य बाजूला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांचे सहकार्य कायम स्मरणात राहील अशा भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
सोमवारी कार्यालयात काम करीत असताना सायंकाळी सहाच्या
सुमारास छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना शहरात प्राथमिक उचारानंतर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
ते उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
Leave a Reply