उसतोडणी कामगारांची काळजी यापुढेही घेतली जाईल – सत्यशिल शेरकर

विघ्नहर सह.साखर कारखान्याकडुन कारखान्याच्या ऊसतोडणी मजुर व कामगार यांना किराणा मालाचे वाटप

सजग वेब टिम, जुन्नर

शिरोली बु.| कोरोनामुळे देशभरात लाॅकडाऊन असल्याने अनेक गोरगरिब, मोलमजुरी करणार्‍या नागरिकांचा जेवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी अनेक व्यक्ती व संस्थासह शासन पातळीवरही उपाययोजना करण्यात येत आहे.

त्यात आता विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. जुन्नर/आंबेगावनेही सर्व ऊस तोडणी मजूर व कामगार यांच्या प्रत्येक कुटुंबास सहा दिवस पुरेल एवढा किराणा मालाचे वितरण करत सामाजिक बांधिलकी जपत यापुढेही उसतोडणी कामगारांची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी बोलताना दिली.

यानिमित्तानं चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, संचालक संतोष खैरे, कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले, सचिव अरुण थोरवे, गटविकास अधिकारी विकास दांगट, पोलिस निरीक्षक युवराज मोहिते यांसह संचालक, पोलिस व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat