उर्वरित १६५ रुपये देऊन ‘एफआरपी’पेक्षाही अधिक रक्कम देण्याचा मानस – सत्यशिल शेरकर

उर्वरित १६५ रुपये देऊन ‘एफआरपी’पेक्षाही अधिक रक्कम देण्याचा मानस – सत्यशिल शेरकर

सजग वेब टिम, जुन्नर

ओझर | श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची उभारणी माजी खासदार निवृत्ती शेरकर यांनी केल्याने तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. त्यांच्या सोबत असलेले त्यावेळचे नेते माजी आमदार शिवाजीराव काळे, वल्लभ बेनके तसेच तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी सहकारात राजकारण न आणता कारखान्याच्या उभारणीत हातभार लावला व विकासाची गंगा आणण्यास मदत केली. आजही सर्वपक्षीय नेत्यांनी विदयमान अध्यक्षांना पाठिंबा दिला. परंतू काहींनी हि निवडणूक लावण्यास हातभार लावला व स्वतः मात्र बाजूला झाले.परंतू सर्व मतदार वर्ग सत्यशील शेरकर यांच्या पाठिशी उभा राहतील. त्यांच्या शिवनेर पॅनलच्या सर्व जागा बहुमताने निवडून येतील असा विश्वास जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी व्यक्त केला.
विघ्नहर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या शिवनेर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र ओझर ( ता. जुन्नर ) येथील गणेश मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

त्यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध पक्षातील नेते, सभासद, ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. सभासद हेच खऱ्या अर्थाने कारखान्याचे मालक आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला बिनविरोध निवडून दिले. आम्ही प्रामाणिकपणे काम करून सभासद, ऊस उत्पादक, कामगार, वाहतूकदार तसेच कामगारांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तसेच उर्वरित १६५ रुपये लवकरचं शेतकर्‍यांना देऊन एफआरपी पेक्षाही अधिक रक्कम देण्याचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष व शिवनेर पॅनलचे प्रमुख सत्यशील शेरकर यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात केले.

यावेळी मंगलदास बांदल, पांडूरंग पवार, शरद लेंडे, आशा बुचके, बाळासाहेब खिलारी,बी.व्ही. मांडे, गुलाब नेहरकर, संभाजी तांबे, कैलास काळे, उल्हास नवले, वर्षा काळे, शुभांगी लाटकर यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ कवडे यांनी केले तर पुण्याचे नगरसेवक विशाल तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat