उद्या शरद पवारांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री शिवनेरीवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरीवर; शेतकरी कर्जमाफी घोषणेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष?
सजग वेब टिम, पुणे
पुणे | काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यावर शिवनेरीवर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता गुरुवारी ता.१२ रोजी मुख्यमंत्री शिवनेरी गडावर येणार आहेत.
ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होत असल्याने या निमित्ताने
शिवनेरी किल्ल्यावरुन मुख्यमंत्री कोणत्या घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवनेरीवरुन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करत सातबारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी मुख्यमंत्री ठाकरे शिवनेरीवर येत आहेत. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच येत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व आहे. हा दौरा ऐतिहासीक ठरावा म्हणून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पवारांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Leave a Reply