उंडेखडक येथे पाच गावातील शेतकऱ्यांना आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते मोफत खत वाटप
उंडेखडक येथे पाच गावातील शेतकऱ्यांना आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते मोफत खत वाटप
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर| कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत म्हणून घेण्यात येत असलेल्या मोफत खत वाटप कार्यक्रमाअंतर्गत सोपेकॉम संस्था पुणे आणि निलेशभाऊ रावते युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज उंडेखडक गावठाण याठिकाणी १०० गोणी युरिया खताचे वाटप करण्यात आले. आदिवासी भागातील उंडेखडक, अजनावळे, घाटघर जळवंडी व चावंड या गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते या सर्व शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल शाळा उपक्रमासाठी दोन LED सेट ग्रामपंचायत उंडेखडक यांच्यावतीने देण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार अतुल बेनके यांनी उंडेखडक गावातील शाळेच्या बांधकामासाठी व रावते वस्ती व मुंडे वस्ती वरील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. खत वाटपाच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी सोपेकॉम संस्था पुणे आणि निलेशभाऊ रावते युवा मंच यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गायत्रीताई रावते, सभापती विशाल तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, प. स. सदस्य अनघाताई घोडके, निलेश रावते, अॅड.ललित जोशी, किरण लोहकरे, देवराम नांगरे गुरुजी, बाळासाहेब सदाकाळ, युवराज लांडे, बाळासाहेब पवार, ग्रामसेवक गाडेकर भाऊसाहेब, शिक्षक वृंद आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका आदी मान्यवर, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply