इरफान सय्यद यांच्या वाढदिनी डॉक्टर्स संघटनांना ‘पीपीई कीट’चे वाटप

इरफान सय्यद यांच्या वाढदिनी देवदुतरूपी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार

वायसीएम रुग्णालय आणि शहरातील डॉक्टर्स संघटनांना ‘पीपीई कीट’चे वाटप

पिंपरी (दि. १७ जून २०२०) | कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशातले सर्वाधिक रुग्ण हे सध्या महाराष्ट्रात आहेत. एवढेच नाही तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्यादेखील राज्यात सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी आपल्या वाढदिवशी कोणताही डामडौल न करता, आपला वाढदिवस कोरोना योद्ध्यांप्रती समर्पित करून, एक आगळा वेगळा आदर्श प्रस्थापित केला. त्यांनी सामाजिक उपक्रमांना अग्रस्थान देत, गेल्या ३ महिन्यांपासुन नागरीकांच्या आरोग्यासाठी लढणा-या पिंपरी चिंचवड शहरातील व जिल्ह्यातील डाॅक्टरांच्या कार्याला सलाम ठोकत, देवदुतरूपी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला.

पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या यशंवतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील डाॅक्टरांचे व शहरातील सर्वच स्थरातील अत्यावश्यक सेवेतील योद्ध्यांचे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात मोठे योगदान आहे. शहरातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी या योद्ध्यांसह डॉक्टर चोवीस तास झटत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांचा रुग्णाशी प्रत्यक्ष संबंध येतो. यासाठी डाॅक्टरांना सुरक्षा साधने कामी येतात. त्यांना मास्कसह ‘पीपीई कीट’ची आवश्यकता असते. इरफान सय्यद यांनी आपल्या वाढदिनी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत, पिंपरी चिंचवड शहरातील डाॅक्टर्स संघटना व महापालिका आरोग्य कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा यथोचित गौरव केला. त्यांनी शहरातील निमा संस्था, सांगवी, पिंपळे गुरव येथील डाॅक्टर्स असोशिएशन, भोसरी डाॅक्टर्स असोशिएशन, फॅमिली फिजिशीयन असोशिएशन, इंडियन मेडीकल असोशिएशन व पिंपरी चिंचवड होमिओपॅथी डाॅक्टर्स असोशिएशनच्या सभासद डाॅक्टरांना मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, डाॅ. श्याम अहिरराव व डाॅ. प्रताप सोमवंशी यांच्या हस्ते पीपीई कीटचे वाटप केले.

यावेळी निमा संघटनेच्या अध्यक्षा. प्रज्ञा खोसे, डाॅ. कल्पना एरंडे, डाॅ. मयुरी मोरे, सांगवी पिंपळे गुरव डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. प्रदिप ननावरे, डाॅ. प्रविण सुर्यवंशी, डाॅ. सुनिल पाटील, डाॅ. राहुल मोरे. भोसरी डाॅक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डाॅ. नंदकिशोर माळभिसकर, डाॅ. सी. बी. पवार, डाॅ. अरूण किंगे, फॅमिली फिजिशीयन असोशिएशनचे अध्यक्ष डाॅ. सारीका भोईर, डाॅ. अजित पाटील, डाॅ पल्लवी चरोटा, इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डाॅ सुहास माटे, डाॅ. सुधीर भालेराव, डाॅ. ललितकुमार धोका, पिंपरी चिंचवड होमिओपॅथी डाॅक्टर असोशिएशनचे डाॅ श्याम अहिरराव, सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके आदी उपस्थित होते.

दरम्यान शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशंवतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील डॉक्टरांसाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे ‘पीपीई कीट’ सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला संघटीका सुलभाताई उबाळे, गटनेते राहुल कलाटे, मंचर-जुन्नर सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, कैलास नेवासकर उपस्थिती होते.

इरफान सय्यद मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘मार्च महिन्यात कोरोनाचं संकट राज्यावर आणि देशावर येऊन कोसळलं आणि उत्तरोत्तर ते अधिक गडद होत गेल. आजही त्याची तीव्रता कमी झाली नाही. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक कार्यकर्ते मला भेटायला येतात, पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. या वातावरणात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. मात्र, वाढदिवसाचे औचित्य साधत, शहरातील डॉक्टरांसाठी पुढाकार घेतला. आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी कोरोना रुग्णाचा जीव वाचविण्याचा आटापिटा करणाऱ्या डॉक्टरांसाठी अत्यावश्यक सुरक्षा साधनांच्या ‘पीपीई कीट’ चे कोरोना योद्ध्यांना वाटप केले. माझ्या वाढदिनी त्यांच्या कार्याची पावती मला त्यांना देता आली. हेच विशेष आहे. माझ्या सच्च्या शिवसैनिकांनीदेखील आहे तिथेच राहून लोकांना मदत करावी. हे करत असताना तुम्ही  तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. तुमच्या जीवापेक्षा मला काहीच मोलाचे नाही, असे भावनिक आवाहन देखील इरफान सय्यद यांनी यावेळी केले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat