आशाताईंच्या हकालपट्टी वर काँग्रेस राष्ट्रवादीची मानसिक मलमपट्टी
शिवसैनिकांची ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ अवस्था
सजग पॉलिटिकल , स्वप्नील ढवळे
जुन्नर | पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या शिवसेनेचे आक्रमक नेतृत्व आशाताई बुचके यांच्यावर शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या हकालपट्टीच्या करवाईचे पडसाद काल जुन्नर तालुक्यात पाहायला मिळाले.
या कारवाईने व्यथित झालेल्या आशाताई बुचके यांना प्रकृती अस्वास्थामुळे काल जुन्नर याठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हि माहिती बुचके समर्थकांना तसेच विरोधकांना समजताच त्यांनीही त्याठिकाणी जाऊन बुचके यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल बेनके व सहकाऱ्यांनी तसेच विघ्नहर चे चेअरमन सत्यशील शेरकर यांनीही बुचके यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवलेल्या या आत्मीयतेचे कौतुक सोशल मीडियावरून होत असतानाच दुसरीकडे सेना नेतृत्वाने बुचके यांच्यावर अन्याय केल्याची भावना सोशल मीडियावरून त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली.
या सर्व घडामोडींमुळे मात्र जुन्नर तालुक्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आला आहे. बुचके यांची भूमिका आणि सहकारी काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तर तटस्थ शिवसैनिकांमध्ये मात्र विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
Leave a Reply