आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध

आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध
– पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव – जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह वारुळवाडी याठिकाणी आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. काल प्रसिद्ध झालेल्या आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत च्या वृत्ताने जुन्नर तालुक्यातील शिवसेनेत अस्वस्थता पसरली असून विविध पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यासंबंधीची मतं आज माध्यमांसमोर व्यक्त केली.

लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचा विधानसभेचा उमेदवार जाहीर करण्यात यावा अशी मुख्य मागणी पदाधिकाऱ्यांकडून पक्ष नेतृत्वाकडे करण्यात आली. आम्हांला विश्वासात घेऊन च वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावेत अन्यथा आम्ही सर्व जण आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा देऊ असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला असून याबाबत पक्ष नेतृत्वाने गंभीरपणे विचार करावा. शिवसैनिकांचा विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला तीव्र विरोध आहे. जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे असं सांगताना उमेदवारीबाबत दगा फटका झाल्यास कार्यकर्ते म्हणतील ती माझी पुढील दिशा असेल असंही सूचक विधान यावेळी केलं.

जर सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली तर बुचके या अपक्ष लढणार का? अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. जुन्नर तालुका शिवसेनेने पक्ष नेतृत्वाला आता सूचक इशारा दिला असून यावर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषदेवेळी उपतालुका प्रमुख संतोष खैरे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुका संघटक योगेश पाटे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, संभाजी तांबे, जीवन शिंदे, मंगेश काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat