आमदार सोनवणेंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजूंना २,४०,००० ची मदत
आमदार सोनवणेंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजूंना २,४०,००० ची मदत
सजग वेब टिम
जुन्नर | आमदार सोनवणे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून जुन्नर तालुक्यातील वेगवेगळ्या गरजू लोकांना २ लाख ४० हजार रूपयांची मदत मिळवून दिली आहे.
जुन्नर तालुक्यातील आगर, जुन्नर येथील विजय विठ्ठल घोणे यांच्या हृदयरोग उपचाराचा खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रु. १,००,००० रु.
, साकोरी तर्फे बेल्हे, जुन्नर येथील रवींद्र सावेळेराम भालेराव यांच्या कर्करोग उपचार खर्चासाठी रु. १,००,००० (एक लाख) , हापुसबाग, शिरोली बु, जुन्नर येथील शिवाजी रखमजी लांडे यांच्या हृदयरोग उपचार खर्चासाठी रु. ४०,००० मंजूर करण्यात आले आहेत.
आमदार शरद सोनवणे यांनी याआधीही मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेकांना मदत मिळवून दिली आहे. सोनवणे हे या निधीचा चांगल्या पद्धतीने वापर करत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना या निधीमुळे उपचार खर्चासाठी मदत होत आहे व दिलासाही मिळत आहे.
Leave a Reply