आमदार शरद सोनवणे यांचे नारायणगावमध्ये मिशन ‘मतसंचय’ जोरात
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव | नारायणगाव शहर आणि परिसरात असलेलं मतदान हे टारगेट ठेवून गेल्या काही महिन्यांपासून अगदी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून नारायणगाव शहर आणि परिसरात आमदार सोनवणे यांचा जनसंपर्क वाढत चालला आहे. सोनवणे हे नारायणगाव परिसरातील छोट्या मोठ्या समारंभांना उपस्थिती लावत आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी ‘धनसंचय’ या चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या पतसंस्थेच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी त्यांनी लावलेली उपस्थिती हि नारायणगाव शहरात चर्चेची ठरली.
सोनवणे, संभाजी तांबे यांची या कार्यक्रमातील उपस्थिती नारायणगाव शिवसेनेच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. बाबू पाटे गटास मात्र सोनवणे यांची हि कृती पसंतीस उतरलेली दिसत नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार आमदार सोनवणे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी बाबू पाटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता त्यावेळी पाटे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे अस मत कळवलं होतं. माजी खासदार आढळराव पाटील हेही या कार्यक्रमास अनुपस्थित होते त्यांचे ही नाव प्रमुख पाहुण्यांच्या यादीत होते.
शहरी मतदान हे जास्तीत जास्त आपल्याकडे वळविण्यासाठीचे उद्दिष्ट ठेवून आमदार सोनवणे हे नारायणगाव भागात जास्तीत जास्त जनसंपर्क ठेवत आहेत.
यादरम्यान लोकसभेचा उमेदवार गावचा असूनही याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ला मात्र म्हणावं तितकं मताधिक्य याठिकाणाहून घेता आलं नाहीये त्यामुळे सोनवणे यांच्या या रणनितीवर राष्ट्रवादी काँग्रेस येत्या काळात नारायणगाव मध्ये काय रणनिती आखते हे पाहणं महत्वाचं ठरेल.
Leave a Reply