आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा – रविंद्र करंजखेले
प्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)
मंचर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्वनियोजित कट करून शिवसेनेच्या व दलित समाजाच्या युवकांना शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या कृत्याचा शिवसेना आंबेगाव तालुका जाहीर निषेध करत आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले यांनी केली.
दलित युवकांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या प्रदीप वळसे, रामदास वळसे व त्यांच्या साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा करंजखेले यांनी दिला आहे.
ह्या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दलित बांधवांच्या मतांवर डोळा ठेवून राज्यात साळसूदपणाचा आव आणत असताना राष्ट्रवादीचे नेते व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या गुंडांकडून स्वतःच्या गावात दलित बांधवांवर असले भ्याड हल्ले करत खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार केल्याने त्यांची खरी प्रतिमा जनतेसमोर आली आहे.
Leave a Reply