आमदार आणि खासदारांच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना आरोग्य सुविधा द्या – नामदेव खैरे

आमदार आणि खासदारांच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना आरोग्य सुविधा दया – नामदेव खैरे यांची मागणी.

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव (दि.१४)| राज्यातील आमदार आणि खासदाराच्या धर्तीवर राज्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबियांना राज्य सरकारकडून आरोग्य सुविधा दयावा. अशीं मागणी भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव आण्णा खैरे यांनी केली. आर्थिक संकटात सापडलेल्या पत्रकार आणि त्यांचे कुंटुंबियांतील सदस्यांचे औषधोपचाराशिवाय बळी जात असेल तर हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, तर दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे.अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

मंत्रालयातील राजकीय वृत्तांक करणारे जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांच्या पत्नी श्रीमती मनिषा गायकवाड यांचे दि.२८मे रोजी निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव आण्णा खैरे यांनी त्यांच्या हिवरे तर्फे नारायणगाव ता जुन्नर जि पुणे येथील राहत्या घरी भेट देवून स्व. मनिषा गायकवाड यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.यावेळी त्यांच्या सोबत जुन्नर भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रज्जाक काझी, पुणे भाजपा सांस्कृतिक सेलचे सरचिटणीस संजय फल्ले, विक्रम कदम, सुरेश शिंदे, अभिषेक खैरे, मनोज बोंद्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.

एखादा आमदार किंवा खासदार अन्यथा त्यांच्या परिवारातील कोणी आजारी पडला की, त्यांच्या रुग्णालयाचे बिल राज्य सरकार भरते.पण एखादा पत्रकार आजारी पडला की,उपचाराविना कधी कधी त्याचा बळी जातो. हीच परिस्थिती त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर ही ओढवते. आज आपल्या राज्यात एकाही पत्रकाराला सरकारचे आरोग्य कवच नाही. करोना सारख्या महामारीत राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत.त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.परंतु या सर्वांची बाजु राखून राज्य सरकारने महाराष्ट्रातील पत्रकारांचा तातडीने आरोग्य विमा उतरविला पाहिजे. तसेच त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला खासदार आणि आमदारांच्या कुटुंबाला ज्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळतो.त्याच धर्तीवर आरोग्य सुविधा दिल्या पाहिजे.अशा भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat