आमचा लोकप्रतिनिधी पाण्याच्या नियोजनाबाबत नालायक ठरला – आशाताई बुचके
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. १६ ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप सर्व पक्षीय कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके यांनी कुकडी प्रकल्पातील विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व आमचा लोकप्रतिनिधी पाण्याच्या नियोजनाबाबत नालायक ठरला असून त्यांना नियोजन करता आले नसल्याची बोचरी टीका करत आमदार सोनवणे यांना घरचा आहेर दिला.
Leave a Reply