Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
आठवण आजच्या दिवसाची… – शिवाजीराव आढळराव पाटील | Sajag Times

आठवण आजच्या दिवसाची… – शिवाजीराव आढळराव पाटील

आठवण आजच्या दिवसाची… ‘संसदरत्न २०१६’ ने सन्मानित झाल्याची !

आजच्या दिवशी म्हणजे सन२०१६ मध्ये सोळाव्या लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल Prime Point Foundation च्या वतीने मला मा.पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांच्या शुभहस्ते आदर्श संसदरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

चेन्नईतील आय. टी. आय. मद्रास प्रेक्षागृहात संसदरत्न पुरस्कार समारंभ संपन्न झाला. लोकसभेतील सर्वोत्कृष्ट पाच खासदार तर राज्यसभेतील एका खासदारांना हा बहुमान देण्यात आला. वर्षभरात मी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर ५४० प्रश्न उपस्थित केले, १५ विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होऊन ३ वैयक्तिक विधेयके लोकसभेत सादर केली. तर खासदार निधीचा मतदार संघाच्या गावोगावच्या विकासासाठी १०० टक्के उपयोग केला. माझी संसदेतील उपस्थितीदेखील ७० टक्क्यांहून अधिक होती. पुणे-नाशिक रेल्वे, रेडझोनची हद्द कमी करणे, बैलगाडा शर्यत, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणे, महत्वाकांशी केंद्रीय प्रकल्प हाती घेणे यासह कृषी विकास, औद्योगिक धोरण, लघुउद्योगाला चालना देणे यासारख्या महत्वपूर्ण प्रश्नांना संसदेत वाचा फोडली. रेल्वे अर्थसंकल्प, देशाचा अर्थसंकल्प आदि विषयांमध्ये चर्चेत सहभागी होऊन सर्वसामान्यांच्या हिताची मते अभ्यासपूर्वकपणे संसदेत मांडली. माझ्या या सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल माझे मन आनंदाने भरून आले होते.

मला आजही आठवते, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास लोकसभा सचिवालयाचे संचालक बी. श्रीनिवासा प्रभू, केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज आहिर, शिवसेना संसदीय गटनेते आनंदराव अडसूळ, भाजपा मुख्य व्हीप अर्जुन राम मेघवाल आदि मान्यवर उपस्थित होते. शिवसेना तामिळनाडू राज्याचे प्रदेश अध्यक्ष जी. रमेश बाबू यांनीदेखील आम्हा शिवसेना खासदारांची भेट घेऊन सत्कार केला होता.

यापूर्वीदेखील १५ व्या लोकसभेत सन २०१४ मध्ये मला संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

शिवाजीराव आढळराव पाटील
शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, मा.खासदार शिरूर लोकसभा

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat