आज अोझर येथे शिवनेर पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ व भव्य जाहिर सभेचे आयोजन
शिवनेर पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ व भव्य जाहिर सभेचे आयोजन
२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा.श्री.क्षेत्र अोझर येथे होणार प्रचाराचा शभारंभ व भव्य सभा
सजग वेब टीम जुन्नर
शिरोली बु.। श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगावच्या संचालक मंडळाचा २०२० च्या पंचवार्षिक निवडणुक मतदान 9 फेब्रुवारी रोजी होणार असुन निवडणूक निकाल 10 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या कुशल नेतृत्वात शेतकर्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असणार्या शिवनेर पॅनेलच्या प्राचाराचा शुभारंभ दि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. अोझर येथुन होणार असुन यानिमित्ताने भव्य जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रम व जाहिर शिवनेर पॅनेलचे सर्व उमेदवारांसह सभेला जुन्नर आंबेगाव तालुक्यातील विविध पक्षाचे नेते व कारखान्याचे सभासद हजर राहणार असल्याची माहिती चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सजग टाईम्सशी बोलताना दिली.
Leave a Reply