अॅरोमाझोटीका कंपनी, मुस्लिम सेवा समिती आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्यावतीने सॅनिटायझरचे मोफत वाटप
पोलिस, डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांना सॅनिटायझर वाटप
अॅरोमाझोटीका हॅन्ड सॅनिटसयझर कंपनी नाशिक, जुन्नर तालुका मुस्लिम सेवा समिती आणि युवा शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सॅनिटायझरचे मोफत वाटप
नारायणगाव | कोरोनापासुन नागरिकांचे संरक्षण व्हावे याकरिता लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस, डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी यांसह शासकीय यंत्रणा कार्यरत असुन त्यांच्या सुरक्षेसाठी अॅरोमाझोटीका हॅन्ड सॅनिटसयझर कंपनी नाशिक, जुन्नर तालुका मुस्लिम सेवा समिती आणि युवा शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने १००० सॅनिटायझर बाॅटलचे मोफत वाटप करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी, पोलिस स्टेशन नारायणगाव, ग्रामपंचायत वारुळवाडी, ग्रामपंचायत नारायणगाव, यांसह जुन्नर तालुक्यातील पोलिस, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी मोफत सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यानिमित्तानं लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सचिन वारुळे, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, गटविकास अधिकारी विकास दांगट, सादिक आतार, आरोमाझोटीला कंपनीचे हसीब मलिक, मुस्लिम सेवा समितीचे मेहबुब काझी, युवा शुक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अशफाक पटेल, जुबेर शेख, रईस चौगुले, यांसह पोलिस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply