अयंssss बाबू पाटे…

नारायणगाव : नारायणगाव चे विद्यमान लोकनियुक्त सरपंच यांच्या मागील वर्षी झालेल्या निवडणूक प्रचाराचा प्रभाव अजूनही तसाच आहे याची प्रचिती काल नारायणगाव मध्ये आली. नारायणगावमधील अनेक लहान मुले आज त्यांच्या गावच्या सरपंचांना ओळखतात त्यांना त्यांचे नावही माहीत आहे. अनेक पालकांना त्यांची मुले त्यांना भेटण्याचा हट्ट ही करतात.

काल मात्र वेगळाच किस्सा घडला. ग्रामपंचायतीच्या कामांचा आढावा घेत असताना वार्ड क्र. ३ च्या खेबडे मळा आणि वैदवस्ती भागात सरपंच, ग्रा. पं. सदस्य अरीफभाई अत्तार, गणेश पाटे सतीश पाटे आदी कार्यकर्ते कामांची पाहणी करताना एका लहान मुलाने बाबूभाऊंना बिनधास्तपणे हाक मारली तीही चक्क अशी “अयंssss बाबू पाटे” ती हाक ऐकून सर्व उपस्थित हास्यकल्लोळात बुडाले. त्या मुलाला मात्र आपण थोडंस अतिउत्साहीपणा दाखवलाय याची जाणीव झाली तो मात्र गर्दीतून हळूच गायब झाला. त्या मुलाने मारलेली हाक त्याचे वय पाहता मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत जे गाणं वाजत होतं ‘बाबू पाटे हे एकच नाव’ त्याचाच हा प्रभाव लहान मुलांमध्ये अजूनही पाहायला मिळत. नारायणगाव मधील सर्वच स्तरातील लोकांमध्ये आपली ओळख पोहोचविण्यात बाबूभाऊ मात्र यशस्वी झालेत हे प्रचाराच्या एकवर्षा नंतरही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या २७ डिसेंबर ला त्यांच्या निवडणूक विजयाची वर्षपूर्ती होत आहे. या धर्तीवर नारायणगाव मध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

शब्दांकन – (स्वप्नील ढवळे)

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat