अग्निपंख फाऊंडेशन व अन्नपूर्णा महिला व्यवसाय गटाच्या माध्यमातून कष्टकऱ्यांना अन्नदान

अग्निपंख फाऊंडेशन व अन्नपूर्णा महिला व्यवसाय गटाच्या माध्यमातून हजारो कष्टकऱ्यांना दररोज अन्नदान चालू

सजग वेब टिम, पुणे

कात्रज | कोरोना सारखा भयंकर रोगाने देशावर संकट आणले. त्यातच मागील एक महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कष्टकऱ्यांच्या चुलीही बंद पडण्याच्या अवस्थेत असतानाच, अग्निपंख फाऊंडेशन व अन्नपूर्णा महिला व्यवसाय गटाच्या माध्यमातून दररोज हजारो कष्टकऱ्यांना अन्नदान सेवा देण्यात येत आहे.

यामध्ये बिगारी कामगार, माथाडी कामगार, बेरोजगार, हमाल, मापाडी, फूटपाथवरील रहिवाशी व गरीब गरजू तसेच ज्यांना जेवणाची कसलीही व्यवस्था नाही, अशा 5 हजार मजुरांना आजतागायत अग्निपंख च्या वतीने अन्नदान करण्यात आले आहे. तसेच हा अन्नदानाचा यज्ञ लॉकडाऊन संपेपर्यंत असाच चालू राहणार आहे असे अग्निपंख संस्थेचे अध्यक्ष रफिक जमादार यांनी सांगितले.

मागील 30 दिवसांपासून पुणे शहर परिसरातील स्वारगेट, भिकारदास चौक, सारसबाग, टिळक रोड, सेव्हन लव्हज, गोळी बार मैदान, कसबा पेठ, टिळक रोड, कात्रज, सातारा रोड येथील गरीब, गरजू, उपेक्षित कुटुंबातील नागरिकांना अन्नदान सेवा चालू आहे.

यावेळी अन्नदान करताना मास्क, सॅनिटायझर, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचा अवलंब करूनच अन्नदान केले जात आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुण स्वयंसेवक म्हणून योगदान देत असून यामध्ये रफीक जमादार, समीर पानसरे, रितेश पाटील, करिश्मा शेख, तोफीक जमादार, मोहम्मदउमर शेख तसेच अन्नपूर्णा महिला व्यवसाय गटाच्या अध्यक्षा प्रीतीताई नाईकवाडी, राबिया शेख अनेक महिला उस्फुर्तपणे सेवा देत आहेत.

या कष्टकाऱ्यांचे या काळात आरोग्य चांगले राहावे म्हणून संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जेवणात दररोज विविध पालेभाज्या, कडधान्ये, विविध डाळी, पोळी, भात भाजी आणि पराठे असे पौष्टीक भोजन दिले जात आहे.

मागील 30 दिवसांपासून चालू असलेल्या अन्नदान सेवेला खंड न पडू देण्यासाठी व बिगारी, मजूर, माथाडी कामगार, हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब, उपेक्षित कुटुंबाना मदत म्हणून, आपल्याला शक्य होईल तेवढी आर्थिक अथवा धान्याच्या स्वरूपात मदत करून सहकार्य करावे असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

गोर गरिबांच्या कुटुंबांना अन्न धान्य स्वरूपात अन्नदान करण्यासाठी संस्थेच्या ९९७५००७९८१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता, तसेच आर्थिक मदत करण्यासाठी, सामाजिक कार्यकर्ते रफीक जमादार यांच्या खात्यावर आर्थिक मदत देवू शकता.

माहिती करिता – युनियन बँक ऑफ इंडिया,
कात्रज शाखा, पुणे, रफिक हारुन जमादार, खाते क्रमांक :- 744702010002366, IFSC, Code :- UBIN0574473 या खात्यावर आपण आर्थिक मदत करू शकता.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat