अखिल भारतीय सरपंच परिषद आयोजित आंबेगाव तालुका सरपंच मेळावा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
प्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)
पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद तर्फे आंबेगाव तालुका सरपंच मेळावा शनिवार दिनांक ९,२,२०१९ रोजी दुपारी २ वाजता शरदचंद्रजी पवार सभागृहात मंचर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी तालुक्यातील उपस्थित सरपंच यांना मार्गदर्शन केले तसेच मेळाव्या साठी आलेले अखिल भारतीय सरपंच परिषद अध्यक्ष, संस्थापक,जयंत सर्जेराव पाटील ,जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे ,यांनी सरपंच यांनी गावचा विकास कसा करावा, त्यांचे अधिकार ,या बाबत मार्गदर्शन केले .
यावेळी सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत मोरे, तालुकाध्यक्ष श्री अनिलशेठ वाळुंज, जिल्हा निमंत्रक भाऊसाहेब मरगळे , राज्य संघटक कैलास गोरे ,आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी अध्यक्ष मा.निलेश स्वामी थोरात, सरपंच परिषद कार्याध्यक्ष श्री संतोषशेठ सैद, महिला अध्यक्षा श्रीम.अनिता भोर मा.सचिन( मामा) जाधव तसेच तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply